येणार नाही...
येणार नाही...
1 min
238
तुझ्यामागे मी राणी
कधी धावणार नाही
थोडा वेडा आहे मी
तुझ्या हाती येणार नाही...
जीन्स टॉप घालून तू
माझ्यासमोर आहेस उभी
तू जर आलीस जीवनात
स्वप्नं माझी जातील नभी
तुझ्या प्रेमाच्या आगीत
मी कधी जळणार नाही...
टिक टॉकची तू आहेस
गं एक शहाणी राणी
माझी मी लिहिली आहे
फेसबुकवर कधीच कहाणी
साधा भोळा आहे मी तुझ्या
जाळ्यात अडकणार नाही...
फिरू नकोस तू मागे मागे
घेऊन तुझ्या प्रेमाचा प्रपोज
इंस्टाग्रामवर का गं मला
तू फॉलो करतेस दररोज
केलं आहे गं मी तुला ब्लॉक
माझी पोस्ट तुला दिसणार नाही...
