या मराठीचा अभिमान ||
या मराठीचा अभिमान ||
1 min
162
शब्द हे गुंगले
शब्द हे रंगले
स्वर हे जुळले
स्वर हे रमले
सुंदर या शब्दांचा गोडवा
या मराठीचा अभिमान
या मराठीचा अभिमान ||१||
महाराष्ट्र हा मराठी,
मायभूमी ही मराठी .
शिवरायांनी गाजवलेला,
इतिहास हा मराठी.
या मराठीचा अभिमान
या मराठीचा अभिमान ||२||
नवे नवे गीत गाते,
नवे नवे क्षण हे सारे,
या शब्दात माळून घ्यावें
क्षण हे आनंदाचे
या मराठीचा अभिमान
या मराठीचा अभिमान ||३||
