STORYMIRROR

Sanjay Ronghe

Others

3  

Sanjay Ronghe

Others

व्यंग सागराचे

व्यंग सागराचे

1 min
272

जीवनाचा भास
सागर अथांग ।

तळाचा का कुठे 
लागतो का थांग ।

दूर किनारा किती 
लाट टाकते अंग ।

नाद ब्रह्मांडाचा जिथे
गातो सागर अभंग ।

भेट सागराची घडे
किनारा असे संग ।

उठती लाटा जशा 
जीवनाचे ते तरंग ।

त्यातही दिसे मज
कसे एक व्यंग ।

दुःख त्या सागराचे
सारे आपल्यात दंग ।

सीमा सरे सागराची
होतो काठावर भंग ।
Sanjay R.


Rate this content
Log in