STORYMIRROR

Asha Donde

Others

3  

Asha Donde

Others

वसुंधरा

वसुंधरा

1 min
183

झाडे लावा झाडे जगवा

वसुंधरा म्हणू लागली

संहार करता वृक्ष वाढवा

वसुंधरादिन ती समजली(१)


☘️☘️☘️☘️☘️


आज कौतुक करातरी

उद्या तुम्ही विसरु नका

स्वच्छ राखा घरीदारी

प्रदुषण तुम्ही करु नका(२)


🌴🌴🌴🌴🌴


बहरली फुलली फुलांनी

हिरवी साडी ती ल्याली

थंडावा नजरेला दिसता

हिरवळ आवडती झाली(३)


🌿🌿🌿🌿🌿


जाईजुई मोगरा फुलला

गुलमोहर केशर शिंपी

आंबा पाडायचा झाला

केशरी तोही डोकावी(४)

🌿🌿🌿🌿🌿


हळूच दिसला तामण

रंग त्याचा बहारदार

जांभळा रंग आपण

पाहताक्षणी आवडणार(५)


 🌿🌿🌿🌿🌿


धनधान्य बहरते शेतात

 किती प्रसन्न शेतकरी

चेह-यावरचा उत्साह

ओसंडून वाहे भारी(६)

🌿🌿🌿🌿🌿


किती कौतुकाची वसुंधरा

लाभली असे भारतभूला

अभिमान वाटतो सारा

सांभाळू या आपण तिला(७)

🍒🍎🍓🍉🍅🍇🍑


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Asha Donde