विनंती
विनंती
1 min
212
🙏🙏🌹🌹विनंती🌹🌹🙏🙏
तूच माता तूच पिता
तूच बंधू सद्गुरू ।
तुझ्यावीण सांग कसा
भवसागर हा तरू ।।
हाक देता धाव घेसी
तव भक्तांना पाविसी ।
गजानना तू सुखकर्ता
दुःख त्यांचे निवारीसी ।।
तुझ्या दर्शनाची आस
मुख म्लान मनी ध्यास ।
अन्न रुचेना जीवास
सदा होई तुझा भास ।।
दैत्य हा विषाणू रुपी
ऊभा येऊन ठाकला ।
केला कहरच त्याने
अन् देव माझा झाकला ।।
देवा करते विनंती
व्याधी नको कोरोनाची ।
रांग लागो दर्शनाची
हीच प्रार्थना कवीची ।।