STORYMIRROR

Madhuri Arjugade

Others

4  

Madhuri Arjugade

Others

वेध भेटीचे

वेध भेटीचे

1 min
416

चुकले असेल काही,

  वारी चुकली नाही... 

बंद गाभाऱ्यात उभा,

  विठ्ठल एकला बाई...


असेल अवघड वाटत,

  त्याचा इलाज नाही...

येतोच तव दर्शनार्थ,

  चालत पायी पायी...


घोळके निघतील आता,

  एकमेका देतील अलिंगण... 

भक्तांच्या मेळाव्यात,

  रंगेल भक्तीचे रिंगण...


तू पाह्य वाट आता,

  सोडू नकोस आस...

गळाभेट हवी माय,

  कीर्तनी रंगू दे रास...


लागले आहेत पुरते,

  वेध तुझ्या भेटीचे...

अंतरात दुमदुमते, 

  भक्ती वारे पंढरीचे...


भेट नाही झाली जरी,

  होऊ नकोस तू कष्टी...

मुखी जप हरिनामाचा, 

  राहू द्यावी कृपादृष्टी ... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Madhuri Arjugade