तू माझी...
तू माझी...
1 min
346
पुस्तक वाचते मला तुच दिसतोस
नजरेसमोर येऊन तू गोड हसतोस
रिकामी आहे तुझ्याविना झोळी माझी.....
कॉलेजमध्ये मी एकटी एकटी असते
मला पाहून माझी बहीण धाकटी हसते
तुझ्याविना झाली रे दुनिया काळी माझी.....
सगळ्या छेडतात मैत्रिणी तुझ्या नावाने
वेडी झाली मी तुझ्या अगाव स्वभावाने
जन्माची काळजी होशील का तू माझी......
