तुझा होईन....
तुझा होईन....
1 min
141
कर चमत्कार की मी तुझा होईन
आज आहे मी दुसऱ्याचा तुझा होईन....
भरून घे तूझं कुंकवानं कपाळ
मरून जाईन मी तू मला संभाळ
कर प्रेमाच्या पत्रावर साजणी साईन....
जगाला पटणार प्रेम परत होणार
मी तुला प्रश्न काही ना विचारणार
तुझ्या डोळ्यातली मला पिऊ दे वाईन....
