थांबून नको पाहू
थांबून नको पाहू
1 min
226
थांबून नको पाहू
सांग मी कसा राहू ।
दूर जाते ही वाट
मधेच उंच घाट ।
उंचच उंच वृक्ष
देऊ कुठे मी लक्ष ।
पक्षांची किलबिल
डबडबले झिल ।
रिमझीम पाऊस
भागली माझी हौस ।
मस्तीत हा नजारा
धुंदीत होता वारा ।
तृप्त झालेत नेत्र
भिजले माझे वस्त्र ।
निसर्गाची किमया
जीवनाचा हा पाया ।
