STORYMIRROR

Sanjay Ronghe

Others

3  

Sanjay Ronghe

Others

" स्वप्न उजेडाचे "

" स्वप्न उजेडाचे "

1 min
205

बघतो जेव्हा मी आकाशात

बदलतात रंग कधी निळेकाळे ।

चाले मुक्त विहार ढगांचा

अखंड प्रवास त्यात सूर्याचा ।

दडतो जेव्हा सूर्य क्षितिजा आड

टीमटिमतात चन्द्र तारे नभाआड ।

न जाणे जातो कुठे तो प्रकाश

पगटतो अंधार घेऊन रूप काळे ।

वाटते जाऊन लावावा दीप एक

उजळावे आकाश सारे अंधारात ।

वाटे मज करावा अंधाराचा नाश

का धारेवर होईल तेव्हा प्रकाश ।


Rate this content
Log in