सुविचार
सुविचार
सुविचार म्हणतो!
माझ्यातल्या चांगुलपणाची चिढ यावी असा आहे का मी?
माझ्याशी अंतर ठेवून रहावे तसा आहे का मी?
सर्वात मिसळणारा नाही का मी?
मग माझ्या सानिध्यात चुप्पी का साधावी?
तरंगात असल्या एक एक कळा जोडत नाही का तुम्हाला?
दोन पाया वर सुद्रृढ असून माझेच पाय ओढतां तुम्ही?
कर्तृत्वाच्या नावा खाली माझे बोल मिरवता तूम्ही?
तेव्हा कोरड्या लोचनी तान्हे अंतःकरणात मी आठवतो!
आणि स्निग्ध करुन तुम्हाला तुमच्याशी जोडतो..
ह्दयातलं प्रेम जागवतो..
तसेच अतिरेकीपणे वर मी च लगाम ठेवतो!
अहो बालकांवर केले संस्कार आहे मी..!
तरुणांच तेज -धीर -नम्रता आहे मी..!
वानप्रस्थ्यांचा अनुभव आहे मी..!
संत महापुरुषांने दिले विचार आहे मी.!
साध्या भोळ्यांची कर्मप्रेरणा आहे मी..!
जिवन आखरे लढण्याची हिंमत आहे मी..!
मला मात्र वरच्या वर धकलू (forward) नका..
तुमच्या दिनचर्येत मला मात्र जगा..!
आणि माझ्यासोबत नवीन आयुष्याला सुरुवात करा..!
