STORYMIRROR

ANJALI WANKAR

Others

3  

ANJALI WANKAR

Others

स्त्री जगण्यातली सिधुताई

स्त्री जगण्यातली सिधुताई

1 min
250

आशेने हंबरडा फोडला, रडली ती अतोनात,

पाखरे तीला चोच मारी, साग अधिकार काय तूझा या स्मशानात,

मुक्या जनावरा माया आली, बेशुद्ध सिधुताई वरती,

दुर सारिले बाकी गाईना, आणि राहीली तीच्या भोवती......1


दु:ख सोसूनी अतोनात, आई झाली गाईच्या गोठ-यात 

नाळ तोडली तव सोडा टाचे, लागली सम मनात,

तहान भुकेने व्याकुड झाली, त्या बाळा संग गोठ्यात

तव आशेने हंबरडा फोडला, रडली ती अतोनात........2


प्रेत चालली आकांत झाला, तिही त्या लोकात,

प्रेतेवरती शिजवून खालली, भाकरी तळहातात,

पाखरे तीला चोच मारी, साग अधिकार काय तूझा या स्मशानात

आशेने हंबरडा फोडला, रडली ती अतोनात.........3


सळसळली अन् रडली माया, ते तान्ह बाळ हातात 

माहेरुनही हाकलून लावली, माणुस रक्ताच अन मासाच,

माय माऊली जगा पोरकी झाली, त्या राक्षसी दुनियेत

आशेने हंबरडा फोडला, रडली ती अतोनात........4


साहित्याला गुण द्या
लॉग इन