सतावतं
सतावतं
1 min
337
कोणी कोणी नशिबालाच हरवतं
माझं नशिब मलाच खूप सतावतं.....
सोबत हरणं हरवणं हे होतं राहतं
जिंकणं जिंकवणं हे चालतं राहतं
सांगा मलाच का हो दुःख जाणवतं.....
सगळ्यांच कधी दिसत नाही दुःख
आपलेच आपलं लपवून ठेवी मुख
माझं मनं हो मनातच दुःख लपवतं......
मी राहतो का माझ्यात किती मग्न
माझ्या उघड्या डोळ्यांची स्वप्नं नग्न
मला माझंच का वाईट स्वप्नं खूणवतं.....
मी ना कोणाकडे कधी दाद मागतो
जे येतं ते लिहून सारं सांगतो
अहो माझं लिखाण मनाला भिडवतं....
