STORYMIRROR

Vibhavaree Lele

Others

3  

Vibhavaree Lele

Others

शत शत नमन ब्रह्माणी

शत शत नमन ब्रह्माणी

1 min
145

।।श्री गणेशाय नमः।।

।।श्री सरस्वत्येय नमः।।


हे शुभ्र कमळ वासिनी

हे धवल वस्त्र धारिणी

हे वागेश्वरी ज्ञानदायिनी

शत शत नमन ब्रह्माणी


हे वेद हस्त धारिणी

हे माळ वरद धारिणी

हे विणाज्ञान गभस्तीनि

शत शत नमन ब्रह्माणी


हे चतुर्भुज कमळनयनी

हे स्वर्ण मुगुट धारिणी

हे स्वामिनी अंतर्यामीनी

शत शत नमन ब्रह्माणी


हे सुमधुर कंठ भाषिनी

हे देवी मातहंसवाहिनी 

हे सरस्वती जगतजननी

शतशत नमन ब्रह्माणी


हे वसंत पंचमी दायिनी

हे शुभ अवसर दायिनी

हे शारदे ज्ञान विभामयी

शत शत नमन ब्रह्माणी.



साहित्याला गुण द्या
लॉग इन