श्रीमंतीचा
श्रीमंतीचा
1 min
399
अगं मी राहतो खेड्यात
मला काढू नको येड्यात
कळेना तुझ्या श्रीमंतीचा खेळ....
कशी सोसू तुझ्या प्रेमाची कळ
पावसाविना झाली जीवनाची भेळ....
तू राहतेस मजेत शहरात
मी घाम गाळतो शेतात दिन रात
काळ्या जमिनीला सहन होईना झळ....
