शिर्षक: निसर्ग माझा सखा
शिर्षक: निसर्ग माझा सखा
1 min
152
निसर्गाच्या सान्निध्यात जावे,
फुलांच्या रंग गंधात नहावे...
मी नभी घन होवूणी बरसावे,
मातीचा कण होवुनी
जलधारात नाहावे....
निसर्गाची सेवा हेचि कर्म,
भरभरून देती आम्हा,
हेचि, माहेरा परि धन...
निसर्गाच्या सान्निध्यात,
मन मोहून जाते,
त्यांच्या कवेत जाता,
आजाराची चिंता पडून जाते...
निसर्गासारखा नाही सोयरा,
गुरू, सखा, बंधु, माय, बाप
त्याच्या कुशीत व्यापताप
मिटतील क्षणात आपोआप.....
