शिक्षणवारी
शिक्षणवारी
(हंबरुणी वासराले चाटती जवा गाय ह्या चालीवरती -- शिक्षणवारी )
अंगणात ठेवता याच्या जवा माझं पाय।
तवा मले तिच्यामदी दिसती माझी माय। ।।1।।
जन्मापासन आलया सुख माझ्या दारी
जशी सुरू झालिया संसाराची वारी
वारीमदी वारीमदी वारीमदी माझा विठू मला भेटणार हाय
तवा मले विठू मदी दिसती माझी माय। ।।2।।
बालपणी झाली सखा संगे अन सोबती।
खेळायला मिळाली आम्हासरे माती।
मातीतून मातीतून मातीतून आता आम्ही आकार घेणार हाय।
तवा मले मूर्तीमदी दिसती माझी माय। ।। 3।।
ग म भ न शिकता शिकता शिकवली ही रीत।
अडचणीच्या डोंगरावरी केलिया हो मात।
डोंगरावरी डोगरावरी डोगरावरी चढून शान शिखर गाठणार हाय।
तवा मले शिखरामदी दिसती माझी माय।।।4।।।
आकडेमोडीची ही फेरी झाली आता सोपी।
माय मराठीन आम्हा कळल्या सगळ्या नाती।
साडेसाती साडेसाती साडेसाती मास्तरमूळ दूर होणार हाय।।5।।
म्हणून म्हणतो आनंदान घ्याव शिक्षण साऱ्यांनी।
ल्योक माझा बनल साहिब वाट आईच्या मनी।
शाळच्या शाळच्या शाळच्या त्या देवापुढ माथा टेकणार हाय।
तवा मला मास्तरमंदी दिसती शिक्षणाची माय। ।।6।।।