STORYMIRROR

Sanjay Ronghe

Others

3  

Sanjay Ronghe

Others

सांजवेळ ही झाली आता

सांजवेळ ही झाली आता

1 min
216

वाट पाहे पिलू घरट्यात

नजर त्याची आकाशात ।

कुठे थांबली आई माझी

लक्ष लागेना कशाकशात ।

सांज वेळ ही झाली आता 

होईल काळोख या गगनात ।

चलबिचल मनात चाले

थेंब अश्रुंचे आले डोळ्यात ।

ओढ लागली आईलाही

लक्ष सारे तिच्या बाळात ।

दूर कशी मी आज आली

किती विचार आले डोक्यात ।

शांत झाले मन तेव्हा

घरटे आले जेव्हा नजरेत ।

आई पिलाची भेट घडली

चिवचिव सरली पिलू पंखात ।


Rate this content
Log in