सांगा काय करायचं
सांगा काय करायचं
1 min
204
झालं ते आता विसरायचं
रुसणं फुगण सोडायचं ।
गालात थोडं हसायचं
पुन्हा नाही रुसायचं ।
मागे कशाला वळायचं
पुढचंच सारं बघायचं ।
मार्ग हा कुठे सरतो
अजून बरंच चालायचं ।
करणार काय आता
नाही मनात ठेवायचं ।
घेऊ वाटून सुख दुःख
हसत हसत जगायचं ।
जेव्हा येईल वेळ तेव्हा
बघू ना काय करायचं ।
टळलं कुणाला मरण
त्यालाही आहे थकवायचं ।
