सांग ना देवा !!!
सांग ना देवा !!!
1 min
189
सांग ना देवा कुठे शोधू तुला.........
शोधले मी सर्वत्र पण देव भेटलाच नाही मला.......... म्हणे देव भक्तीचा भुकेला ....
पण पैसा द्यावा लागतो पाहण्यास तुला.....
सांग ना देवा आम्हा पामराचे काय चुकल....
सांग ना देवा तू दगडातच का वसला....
तु आहेस कणाकणात प्रतेकाच्या मनात.....
कधीतरी होत ऐकलं......
पण आज विआयपी दर्शन घेऊन....
तुझ हसर रूप नाही भासल.....
तुझ तरी काय चुकल.....
आम्हा माणसांनी तुला पैशासाठी विकल.........
मनी हवा श्रध्देचा भाव तुला.....
पण माणसानं व्यापार केला.....
म्हणे तु जर हे केलं तर मी हे करेन ...
चुकलच रे आमचं .........
आतातरी पाव ..भक्ताच्या हाकेला आतातरी धाव...
सांग ना रे देवा कुठं शोधू तुला ......
