रुमाल
रुमाल
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
तू दिलेला रुमाल पाहून
तुझी आज आठवण आली....
एप्रिलच होतं कडक
ऊन
मला पाहून तू गेली
होतीस भारावून
तो क्षण आठवण येतो
तू गेली होतीस माझ्यावर
रागावून
तुझ प्रेम होतं इतकचं
तू माझी ना राहिली.....
कमी माझी तुला
सखे जाणवते की नाही
माझ्यासारखं तुझ्यावर कोणी
हक्क गाजवते की नाही
रातभर जागवत का तुला
कोणी फ़ोन करून
साधा सरळ होतो मी
तू मला बिघडवून गे
ली....
आजही तुझ्या होई गोष्टी
जेंव्हा मी मित्रांमध्ये असतो
तुझ्या वाढदिवसा दिवशी
केक कापून मी पार्टी करतो
आजही मन लागेना तुला
आठवण करून
आपण भेटतं होतो ज्या गल्लीत
ती आज वीरांन झाली....
तुला मिळवू शकलो नाही
हयाच गोष्टीची खंत
जीव जात आहे
तरीही तो तुझ्यासाठी जिवंत
दिन रात नाव जपतो थकलो
मी देवाला प्रार्थना करून
खूप केले उपवास पण तू
माझी ना झाली.....