STORYMIRROR

Sanjay Ronghe

Others

3  

Sanjay Ronghe

Others

रंगली मैफिल जीवनाची

रंगली मैफिल जीवनाची

1 min
190

रंगली मैफिल जीवनाची

येते प्रचिती सुख दुःखाची ।

मार्ग तसा हा नाही सोपा

कोणास काळजी कोणाची ।

आचार विचार वेगळे सारे

अवस्था कशी या मनाची ।

कण कण घेतो वेचून सारे

नाही फुरसत एका क्षणाची ।

फुलते हास्य गाली जेव्हा

फुलते कळी मग आनंदाची ।

धडपड चाले जगण्यासाठी

चिंता कुठे त्या मरणाची ।


Rate this content
Log in