रंगांची किमया
रंगांची किमया
1 min
343
रंगांची किमया आहे खरंच निराळी,
आनंद आणि उत्साह घेऊन येते होळी.
चहुदिशी होते उधळण रंगांची,
हा सण घेऊन येतो वर्षा प्रेमाची.
लाल, हिरवा, निळा, पिवळा, केशरी आणि गुलाबी,
किती किती ते रंग होळीचे सजती या नभी.
भिरभिरती नजर तिची तिच्या सख्याला शोधते,
आतुरतेने ती आपल्या प्रेमाची वाट बघते.
दिसताच तो लाजून रंग प्रीतीचा चढतो तिच्या गालावरी,
असे भासते राधा आणि कान्हाच जणू अवतरले पृथ्वीतलावरी.
#रंग बरसे नाविन्याचा घेऊन नवी उमेद,
नात्यांचा नवा गोफ गुंफतो विसरून सगळे मतभेद.
रंगवुनी एकमेकां विरून जातो दुरावा,
अन् होळीच्या या पावन दिनी जुळतो ऋणानुबंध नवा.
