STORYMIRROR

Sanjay Ronghe

Others

4  

Sanjay Ronghe

Others

" रम्य दिवस ते बालपणीचे "

" रम्य दिवस ते बालपणीचे "

1 min
188

अजूनही आठवतात हो मला

रम्य दिवस ते बालपणीचे ।

कॉलेज सरले नोकरी आली

चाळतो पाठ जीवनाचे ।

हसायचे आणि खेळायचे

कधी बिनधास्त भटकायचे ।

मित्र असायचे संगतीला

पाठीराखे तेच जीवनाचे ।

गाडा संसाराचा येता हाती

सैल झाले नाते मैत्रीचे ।

आठवण मात्र निघत नाही

अस्तित्व मनात मित्रांचे ।


Rate this content
Log in