रक्षाबंधन
रक्षाबंधन
1 min
191
रिमझिम सरी बरसल्या
पाऊल खुणा उमटल्या
तुझ्या माझ्या भेटीचा
सण हा रक्षाबंधनाचा
क्षण आनंदाचा
भावाबहिणीच्या नात्याचा
मनातूनी उधळे त्यांच्या
सारा आसमंत आठवांचा
भाऊ तिचा सखा
तोच पाठीराखा
लहान असूनही देतो
माय वडीलांसारखा
बहिणीची वेडी माया
वेळेला देते आईची छाया
दोघांमधल्या अतूट नात्याचा
दुवा असतो तो रेशमी धागा
नाते रक्ताचे असो वा मानलेले
कोणत्याही स्थितीत न हरलेले
कारण तो नसतो नुसता धागा
असते मनातील एक निवांत जागा
