पत्र लिहावं म्हटलं
पत्र लिहावं म्हटलं
1 min
157
पत्र लिहावं म्हटलं तर
प्रश्न किती मनात ।
पेनच कुठे ठेवलं आहे
येईना हेच ध्यानात ।
शधून शोधून थकलो शेवटी
सापडले एका खाण्यात ।
बसलो मग मी पत्र लिहायला
आठवेच ना काय ते मनात ।
दूर कुठून सूर आलेत
दंग झालो त्या गाण्यात ।
राहिलंच शेवटी सारं लिहायचं
काही उरलंच नाही ध्यानात ।
