पतंग
पतंग
1 min
109
मन माझं प्रेमात एक उनाड वारा
दे मज साजणी तू लबाड सहारा
तुझ्या नखऱ्याची पाहू दे मला जंग..!!१!!
पाहून तुझी अदा मन घायाळ झाल
तुझ्यासाठी माझं मन व्याकुळ केलं
उडत आहे मी आसमानी बनून पतंग..!!२!!
प्रेमाची बांधली मी तुझ्यासोबत दोर
जिवाला लागला आहे तुझाचं घोर
राणी माझ्या प्रेमाचा करू नको भंग..!!३!!
