STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

3  

NIKHITA DAKHORE

Others

प्रयत्नांची गती

प्रयत्नांची गती

1 min
227

तू थांबवू नको 

तुझ्या प्रयत्नांची गती...

एक दिवस नक्कीच 

होईल बघ तुझी प्रगती...


हसव फुलव तुझ्यासोबत 

निराधारांचे जीवन 

देऊ नको अहंकाराला जागा 

कारण त्यानेच होते रे अधोगती...


अहंकार, लोभ मीपणा वाढत 

होत आहे समाजाची दुर्गती 

रोखण्या दुर्गती समाजाची 

उठ जागा हो विसर अहंपणा 


जागव समाजात

माणसातील माणुसकीच्या जाती...

तेव्हाच जपली जातील 

समाजात जिव्हाळ्याची नाती...

मग बघ कशी फुलून

येईल प्रेमाची शेती...


साहित्याला गुण द्या
लॉग इन