पर्यावरणाचा ऱ्हास आणि परिणाम
पर्यावरणाचा ऱ्हास आणि परिणाम
1 min
244
झाडे लावा झाडे जगवा फक्त प्रचार
वृक्षांचा का असा करतो संहार
निसर्गाचा ठेवा जतन करा र
कसं सांगू मानवा तुला वारंवार !!
वाहनांचा आहे अती वापर
दिवस रात्र यंत्रांची असते घरघर
प्रदूषणाचा झाला भस्मासुर
कसं सांगू मानवा तुला वारंवार !!
फटाक्यांचा आवाज करती कर्णबधीर
धुरामुळे बळावती श्वास आजार
मोबाईल ने वेडावले लहान थोर
कसं सांगू मानवा तुला वारंवार !!
वरुणराजा का नाही रुसणार
वेळेवर कसा तो बरसणार
लहरीपणाला त्याच्या आपण जबाबदार
कसं सांगू मानवा तुला वारंवार !!
पावसाविना शेत कशी पिकणार
दुष्काळाचं संकट उभ ठाकणार
बळीराजा आमचा होईल चिंतातुर
कसं सांगू मानवा तुला वारंवार !!
कर्जाचा डोंगर उभा राहणार
आत्महत्याने काळीज सुन्न होणार
तुटपुंज्या मदतीने काय होणार
कसं सांगू मानवा तुला वारंवार
कधी बरे धडा तू घेणार !!
