परी सावळी....
परी सावळी....
1 min
187
तुझ्या प्रेमावर माझा धाक
माझ लहान चिमणी सारख नाक
बघ साजणा माझी अदा जगावेगळी..!!१!!
नटखट दिसायला साधी भोळी
सख्या साजणा मी तूझी परी सावळी..!!धृ!!
नखरा माझा तुला पाजतो पाणी
नाही अगाव मी घालते एक वेणी
साध भोळ माझ रूप ना रंगाने काळी..!!२!!
आई बाबानी मला लाडात पाळल
चढत्या वयात मला तुझ प्रेम कळल
रागा रागात बोलते देईना मी रे गाळी..!!३!!
तू तिकडे मी इकडे मुंबईत शिकते
तू लिहतोस लातूरमध्ये मी रोज वाचते
चल लवकर हो माझा मी मुलगी निराळी..!!४!!
