प्रेम
प्रेम
माया, आपुलकी, रूसवा, अबोला
हे सगळेच अंश प्रेमाचे,
तीळा-तीळातुन होतो तिळगुळ हा जसा गोड
मनाशी मनं जुळल्याने होते प्रेम हे अमर
माझं तुझं करता करता कधी ते 'आपलं' होतं कळतचं नाही
प्रेमाचीच जादु ही सारी
बहुदा, आपण प्रेमात पडतो, डुबतो, कोणी प्रेमात उभं राहिलय असं वाटतं नाही
हा एकचं असा भाव असावा जिथे आपण पडुन, डुबून, प्रेम रोग लागुन सुध्दा होतो सुखी व आनंदी
एक एक पेशी पासुन आपण जसे बनत जातो
तसेच प्रेमाच्या धाग्यात हे ह्यदय गुंतत जाते
कधीच वाटत नाही हा गुंता सोडवावसा
प्रेमाचा आनंद घ्यावा आणि द्द्यावा अडकुनी ह्याच गुंत्यातं
अडकुनी आहे ही सबंध सृष्टी ह्याच गुंत्यातं
म्हणुनच तर, माझा परिवार, आपले घर, आपला देश, आपली वस्तु,
आपले नातेवाईक, आपला निसर्ग आपण एकमेकांचे आपलेसे होऊन जातो
सशक्त असावं प्रेमासारखं जे सतत वाढतं आणि विस्तारतं
प्रेमात असावा आपलेपणा
अहंमपणा नसावा
सुखदुखांच्या ह्या हिंदोळयावर
सतत प्रेमाचाच असो विसावा.
