STORYMIRROR

Shivraj Andurkar

Others

4  

Shivraj Andurkar

Others

प्रेम भावा-बहिणीचे

प्रेम भावा-बहिणीचे

1 min
508

प्रेम भावा-बहिणीचे

जगा वेगळे असते

भाऊबीज सन मात्र

बहुमूल्यच भासते


नाही दुरावा नात्याला

लागे भास जीवनाला 

सोबतीच माझा दादा

फक्त हा आठवणीला


आस तुला भेटण्याची

घरी माहेरी येण्याची

एका वर्षात ये सन

आठवणी पुसण्याची


तुला बघताच दादा

दुःख सारे विसरून

मनी भाव लाग वेडे

कष्ट तुझे रे अपार


आला सण भाऊबीज

मन उतावले झाले

बघताच तुला दादा

अश्रू डोळ्यात आले


साहित्याला गुण द्या
लॉग इन