STORYMIRROR

sunil ade

Others

3  

sunil ade

Others

पोळा

पोळा

1 min
185

पोळा आला बैला, तुले चारु तरी काय?

तुयासाठी उसणी आणलीरे , पुरणाची दाय ।।धृ।।

मरे वरी काम करुन, मले अन्न देत गेला

तुया पोटा पाण्याचा ,तुनं ईचार नाई केला ?

सण आला तुह्या, आता तरी खायं

तुयासाठी उसणी।।१।।


वर्साकाठी तुले तरी, भेटतेरे पुरणं

आम्हालेतं वर्स वर्स, येत नाई वरणं

पुरणासाठी गरं गरं, फिरलीरे मायं

तुयासाठी उसणी ।।२।।


पिकवु किती शेता मंधी,आले नऊ नाकी

ह्याचे देल्ले,त्याचे देल्ले ,पाटलाचे बाकी

चा-यासाठी हंबरते, गोठ्यामंधी गाय

तुयासाठी उसणी ।।३।।


मोठा होरे पोरा,लई चांगला शिक

शेती करुन याले त्याले , मांगु नको भिक

तू तरी कर्जासाठी धरु नको पाय 

तुयासाठी उसणी ।।४।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from sunil ade

पोळा

पोळा

1 min वाचा