STORYMIRROR

Radhika Vaishnav

Others

3  

Radhika Vaishnav

Others

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
219

कधी येईल पाऊस, वेडे मन कासाविस

पूरे ग्रीष्माचे विरह घना, येई लवकर


झाडे आसुसली किती, वेली वाट पाही किती

वेडा चातक ही पहा सरीं साठी हा झुरती


कधी पाऊस येईल, चिंब चिंब भिजवेल

मातीसवे भेट होता, गंध प्रेमाचा उरेल


कोणा कोणाचीही प्रीती, जणू कान्हा पाऊस होती

फुले, वेली आणि माती, सारे गोपिकाच होती


(पाऊस आल्यावर...)

आला आला हा पाऊस, किती घेऊ मी कवेत

झाडे पसरून हात, गाई पावसाचे गीत


चातकही सुखावला, मज मीत हा भेटला

सरी सवे बघा कसा आज मोरही नाचला


पावसाची मग भेट मित्र उन्हाशी या होती

दोघे मिळूनिया नभी इंद्रधनू हा रेखती


वेडा होऊनिया वारा घुमे घरारा घरारा

थेंब पाण्याचा पिऊन देई अंगी हा शहारा


डोई पाऊस घेऊन कळी कळी उमलली

राना-वनांनीही बघा हिरवी शाल पांघरली


पहा आनंदी आनंद आज चोहीकडे झाला

वेडा पाऊस हा कसा मोठा जादूगार झाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Radhika Vaishnav