STORYMIRROR

Shubhangi Sonawane

Others Children

3  

Shubhangi Sonawane

Others Children

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
63

पक्ष्यांचा किलबिलाट

मधुर आळविती सूर

मयुराचा रंगीत पिसारा

डोलवी सौंदर्याचा नूर 


टपोऱ्या नयनांत दाटती

जलकुंभ पावसाचे

काळया मेघांच्या सरी

स्वप्नपूर्ती बळीराजाचे 


निर्झर ओढे नद्या

बळ मागे पावसाला

धावण्यास वेग येई

प्रियतमाच्या भेटीला 


धरणी होई आतुर

मेघराज भेटीसाठी

हिरव्या शालूची नवलाई

नेसून अनुभवण्यासाठी 


वृक्ष वेली माळराने

उतावीळ नटायला

पावसाच्या सरींसंगे

झिम्माफुगडी खेळायला 


ओढ प्रेमळ पावसाची

प्रेमरंगी रंगण्यास

साऱ्या सजीव सृष्टीची

तहान भूक हटवण्यास 


छोटी छोटी बालके

वाट पाही पावसाची

साचलेल्या पाण्यात

आनंदे उड्या मारण्याची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Shubhangi Sonawane