न्यारी
न्यारी
1 min
224
पोरगी गावातली
करे डोळ्याने वार
बोल तिचे तिखट
जसे तलवार
मी मरतो तुझ्यावर
तू ऐक ग पोरी....
तुझ्या गालावरची
खळी पाहून
माझी दुनिया झाली
न्यारी...
माझी नजर पाखरा
सारखी तूला शोधते
तू आंबट नखऱ्यात
मला बोलते
तूझ्या प्रेमात बहरेल जीवन
तूच मला प्यारी...
वरात घेवून येईन
बघ तुझ्या गावात
मी विसरलो भान तुझ्या
दोन अक्षरी नावात
माझ्या खोडकर स्वप्नांची
तू आशा सारी..
