Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

prasanna dabholkar

Others

4.4  

prasanna dabholkar

Others

नवविवाहितांसाठी अनुभवामृत

नवविवाहितांसाठी अनुभवामृत

1 min
36


मंगल दिन लग्नसोहळा नवीन जीवन मुग्ध फुलोरा

आप्तेष्टांच्या सद्भावांचा चिंब करे वर्षाव सारा

असोत खळगे या वाटेवर हात हाती घट्ट धरा

अनुभवाचे बोल सांगतो हृदयी धरा हा बोध खरा ||१||

दोन जीव जिवलग बनती असती रुपे जरी वेगळी

पैस आपुला सांभाळुनी परस्परांवर धरू सावली

आदर दुजाचा सदा करावा प्रेम म्हणजे वर्चस्व नसे

आता उणे कशास काढा तू माझीच निवड असे ||२||

समजून घ्यावे एकदुजाला तू कमी तेथे मी

मते असोत वेगवेगळी संसारी या एक आम्ही

भोग उपभोग भाग जगाचा तेच काही सर्वस्व नसे 

विशाल उत्कट प्रेमामध्ये इतरांचा सहभाग असे ||३||

जीवन अपुले सफल करा हो वेळ, कष्ट, अन् यत्न करोनी

अडचणींवर मात करावी सदा अंतरी विश्वास राखुनी

होतील नक्की वाद कधीतरी दोन दिशांना तोंड फिरे

गुण प्रियाचे मनी स्मरोनी परत प्रेमात पडा बरे ||४||


Rate this content
Log in