नखरेवाली
नखरेवाली
1 min
393
नखरे दाखवू नको नखरेवालीला
सहन तुला माझे नखरे करावे लागणार.....
ऐक माझी गोष्ट तू कान खोलून
उगीच नको जावू तू माझ्यावर चिडून
गप्प बस मी आधी सारखी नाही वागणार.....
आई वडिलांच्या घरी माझ्या श्रीमंती
मी तुझी बायको तूच रे माझा पती
सांग तुझ्याशिवाय माझे लाड कोण पुरवणार.....
कर माझ्या साऱ्या आशा पूर्ण
मी आंबट आहे तू माझ चूर्ण
अगाव स्वभाव माझा तूच पाहणार...
तुझ्या इतकी मी ना धीट
रहा गुप चूप माझ्या सोबत नीट
सांग माझ्यासारखी राणी कुठे मिळणार.....
