STORYMIRROR

PARNAVI PATIL

Others

3  

PARNAVI PATIL

Others

निसर्ग

निसर्ग

1 min
218

निसर्ग म्हणजे जगण्याचा स्वर्ग

आनंदाने, उत्साहाने, गजबजलेला मानवाचा वर्ग..

मानत नाही तो धर्म,पंथ

सर्व जनांसाठी बनून वाहतो मायेचा झरा संथ..

येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकालाच

घेऊन मायेच्या ऊबेत देतो त्याला थारा

निसर्गाच्या सानिध्यात बरसू लागतात

प्रत्येकाच्या डोळ्यातून आनंदाच्या धारा..

निसर्ग आहे एक दुनियाच वेगळी

म्हणूनच त्याची कहानीच निराळी..

इथे थकलेल्या,खचलेल्या,हरलेल्या

प्रत्येकालाच मिळते एक नवी आशा

अशा या निसर्गाला नाहीच कोणती भाषा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from PARNAVI PATIL