मरण्याचे
मरण्याचे
1 min
236
आईचं रागात ओरडणं हिंमत देत होतं
बाबांचं प्रेम माझे ते लाड पुरवत होतं
दिवस गेले ते खाऊसाठी भांडण्याचे....
गाव सोडून आलो मी शहरात
हरवून बसला जग संसारात
हरवले ते दिवस बहिणीच्या प्रेमाचे....
आज माझ्या मुठीत हे जग आलं
येऊन गावात परत जन्माचं पुण्य मिळालं
माझं एकच आहे स्वप्न गावात मरण्याचे....
