मिळवणारे...
मिळवणारे...
1 min
227
माझ्या सुखात आपले
दुःख लपवणारे
नेहमी मिळाले मित्र
मला हात मिळवणारे...!!धृ!!
हया जगाचा नियम
हा असा कसा
ईमानदारीने जगतो मी
मिळे दगेपणाचा वसा
सारे मिळाले जिवाला
जीव लावून जीव घेणारे...!!१!!
सगळ्यात भारी पडते
मला दुनियादारी
सोबत हसलेल्या खेळलेल्या
मित्रांची गद्दारी
एकाच ताटात जेवून
मला विष पाजणारे...!!२!!
पाहिजे माझ्याकडून
कोणाला काही ना काहीतरी
मन माझ उधार मी भरतो
त्यांची तिजोरी
स्वता उंच झेप घेवून माझे
पंख कापणारे....!!३!!
