मैत्री
मैत्री
1 min
194
मोत्याच्या माळी मधला एक मणी
आज अचानक खाली पडला
पडता पडता आपल्या सोबत
इतर मण्यांना सुध्दा घेऊन गेला
पाहताच तो अनपेक्षित क्षण
टचकन डोळ्यांत पाणी आले
आठवले दोस्तीतले ते दिवस
अन् त्या सोबतचे दोस्त ते प्यारे
हरवले ते दिवस सारे
अन् हरवल्या त्या मैफिली
राहिले ते क्षण मनी
बनून केवळ आठवणी
सुटले ते मोती सारे
अन् विखुरले या पृथीवरी
उरलो केवळ एकटाच
एक एकटाच या जगी
