STORYMIRROR

ASHWINI NAVALE

Others

3  

ASHWINI NAVALE

Others

मैत्री

मैत्री

1 min
11.9K

सुरुवात कोठून? कधी? झाली आणि पुढे थांबणार कोठे? कधी? हे अज्ञात असलेला एक स्वैर प्रवास म्हणजे मैत्री...

सत्य, विश्वास, स्नेह, प्रगल्भता हे तर मैत्रीचे अनेक पैलू,

पण नाही वयाचे बंधन ना वेळेचे भान, ना कसली भीती यातच दडली आहे खऱ्या मैत्रीची शान...

म्हटलं तर दोन अक्षरी शब्द जो क्षणात अनुभवता येईल, म्हटलं तर एक मजबूत बंध, जो एक माझं म्हणण्याजोग नातं जोडेल, अशी गमतीदार असते ही मैत्री...

मैत्री असते बोलकी, निखळ आनंद मिळवून देणारी,

पण अबोल असतानाही जी हृदयाची स्पंदने अचूक टिपते ना ती खरी मैत्री...

खरं तर अक्षरांमध्ये तोलावी इतकी साधी भावना नाही,

पण हिऱ्यापेक्षाही मौल्यवान आहे ही मैत्री...

छोट्याश्या आयुष्यात मैत्रीचे एक गाव असावे,

ज्यात भटकंती करण्यात मन रमून जावे...


Rate this content
Log in

More marathi poem from ASHWINI NAVALE