STORYMIRROR

Mayur Gurav

Others

3  

Mayur Gurav

Others

माय

माय

1 min
407

तूच तर आहेस खरी शक्ती

तुझीच करतो मी भक्ती

किती ती अफाट सहनशक्ती

साऱ्या कुटुंबाला सांभाळती

नाही कधी घेत आराम 

सगळे दिवस करीते काम

तरी नाही कुठली तक्रार तुझी

सर्वांचं पोट भरून तूच उपाशी

अनेक नाती निभावतीस तू

सारे चटके सोसतीस तू 

आई असते ती कटुंब चालवते

बायको ही साथ देते

बहीण भावाची लाड पुरवते

मुलगी यशाचे शिखर गाठते

तू एक आधार असतेस

तू एक प्रभावी वक्तिमत्व असतेस

तूच एक ज्वाला आहेस

जे अन्यायाला वाचा फोडतेस 

तू एक प्रकाशकिरण आहेस

निराशेतून काढणारे दीपक आहेस

तुझ्या अनेक कार्याला माझा सलाम आहे

तुझे आयुष्य आम्हाला मोलाचे आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Mayur Gurav

माय

माय

1 min वाचा