STORYMIRROR

Sanjay Ronghe

Others

4  

Sanjay Ronghe

Others

" माता पिता "

" माता पिता "

1 min
334

माय माझी माता

बाप माझा पिता ।

प्रेमाचा घडा तेचि

करी माझ्यावर रिता ।


तान्हुला होतो जेव्हा

घास भरविला शिता ।

लहानाचा केला मोठा

शिकविली मज गीता ।


रात्रंदिवस माझ्यासाठी

उपसले कष्ट न भिता ।

पाहिले डोळ्यात स्वप्न

आसवं आत पिता पिता


मोठा मी झालो बघा

सांगा हे कुणाच्या हिता ।

म्हातारपण आले त्यांचे

काळजी त्यांची मज आता ।


Rate this content
Log in