STORYMIRROR

Mrunal ghate

Others

3  

Mrunal ghate

Others

माहेरच्या स्मृती

माहेरच्या स्मृती

1 min
403

माळावरी उजाडशा

नादावल्या स्मृती जुन्या

रेंगाळती मनातल्या

अश्रुंचिया लडी पुन्हा


वेचू तरी खुणा किती

दारातल्या झुल्यावरी

सांजावल्या नभांतरी

छाया अशी मुक्यापरी


डोकावतो गुलाब हा

ख्याली जशी विचारतो

चाफासुद्धा खुणावतो

गंधाळुन दंवारतो


भेटायला थवे पहा

माहेरचे जणू कुणी

वाकूनिया हळू पुसे

सांगायला उणीदुणी


माहेरच्या जुन्या स्मृती

हृदयामध्ये डहूळती

डोळ्यातुनी घनांपरी

संवेदना उधाणती   



साहित्याला गुण द्या
लॉग इन