क्रांती ज्योति
क्रांती ज्योति
1 min
175
पडली ठिणगी क्रांतीची
पेटली ज्योती ज्ञानाची
ज्योतीने ज्योत पेटली
सावित्रीच्या क्रांती रूपाने
ज्योती भोवती पतंग फडफडे
प्यास तिला ज्ञानाची प्यास तिला ज्ञानाची
त्यासाठी सोसली झळ तिने अपमानाची
पण नाही फिरली माघारी नाही फिरली माघारी
स्त्रीजातीचा कलंक पुसून उभी ठाकली पाठीशी
बालविवाह आणि सती प्रथा ती लावली धुडकावून
म्हणूनच म्हणे ती स्वतःला
व्हयं मी सावित्री व्हयं मी सावित्री
