कोंदण
कोंदण
1 min
197
कोकणच्या निसर्गाचा
नाद खुळा हाय
ह्याच्याशी कधी कोठें
पंगा घ्यायचा नाय॥
हिरव्या हिरव्या झाडांची
जाळी हिरवीगार
काजू, रानमेव्याचा
चव मजेदार ॥
निळ्या निळ्या समुद्राचा
थांग कोठे हाय
उंच उंच लाटांची
खोली ठावूक नाय ॥
निसर्ग आहे इथला
दमदार, मनसोक्त, मजेशीर
माणूस ही आहे इथला
निसर्गाच रूप दुसरा ॥
कोकणातील सौंदर्याचे
कोण्या शब्दातील वर्णन
नक्षीदार, सुंदर भासे
जणू जमिनीवरील कोंदण॥