काजळ
काजळ
1 min
422
ना लावलं असतं डोळ्यात काजळ
ना लागली असती प्रेमाची झळ
मी करते प्रेम तुझ्यावर
मी तुला सतावत नाही.....
जग विसरून तुझ्यात झाले वेडी
तुझ्या रागाची माझ्या हातात बेडी
कसा विसरलास तू माझं प्रेम
तुला का आठवत नाही.....
तुझी ती शपथ नागिणीसारखी डसते
सांग ती कोण तुझ्यासोबत हसते
झाले खूप वाईट माझे हाल
एक मला मरवत नाही..
