STORYMIRROR

Sanjay Ronghe

Others

3  

Sanjay Ronghe

Others

का झालास तू वैरागी

का झालास तू वैरागी

1 min
11.8K

सोडून तू रे घरदार

का झालास वैरागी ।

सांग ना कुणासाठी

झालास तू असा त्यागी ।


काखेत झोळी तुझ्या

अंगावर वस्त्र एक भगवे ।

विचार आमचे कुत्सित

केले तुलाच रे नागवे ।


लोभ मोह माया मत्सर

सोडून तू असा निघाला ।

भावना क्रूर किती आमची

सम्पविले तुझ्या जीवाला ।


रक्षक झालेत रे भक्षक

विश्वास करू मी कुणाचा ।

थांग लागणे कठीण रे

धगधगलेल्या या मनाचा ।


पेटली आहे आग आता

उरेल फक्त राख त्याची ।

माणूस मारेल माणसाला

लागली तहान रे रक्ताची ।


माणुसकीचा झाला अंत

कोण महात्मा कोण संत ।

रक्त पिपासू झालो आम्ही

नाही कसलीच आम्हा खंत ।


कोण निरपराध सांग इथे

अपराधी ही उन्मत्त झाला ।

भाव आता त्याच्या चरणी

तोच भोगी महान झाला ।


Rate this content
Log in